च, छ, ज, झ चे मराठीत दोन उच्चार होतात. दंततालव्य (?) आणि दंत्य (?)

तेव्हा दंततालव्याआधी आलेल्या अनुनासिकाचा उच्चार ञ् (अंय् असा काहीसा) होतो.

उदा.

पंजाब -> पञ्जाब, पंचामृत -> पञ्चामृत

मात्र दंत्यांआधी आलेल्या अनुनासिकांचा उच्चार न् असा (इतर त थ द ध न ह्या दंत्यांआधी येणाऱ्या अनुनासिकाच्या उच्चाराप्रमाणे) होतो, असे वाटते.

उदा.

उंच -> उन्च, गंज -> गन्ज

टीप. दंत्य आणि दंततालव्य हे शब्द कदाचित चुकीचे असतील चू.भू.द्या.घ्या.