त्यामुळे युरोपीयांना पूर्वेकडचे ज्ञान मिळवण्यासाठी अरबस्थानाच्या पूर्वेला जाण्याची गरज वाटली नसावी असे वाटते.

हे मध्ययुगात घडले असे वाटते. पण कुठेतरी युरोपीयांसाठी मध्यपूर्व हीच पूर्व दिशेची परमावधी झाली असे मलाही वाटते.

भारतात युरोपीय लोक मसाले, रेशीम इत्यादींच्या व्यापारासाठी आले, ज्ञानार्जनासाठी नाही असे वाटते.

हे तितकेसे खरे नसावे. ख्रिस्तानंतर सुमारे १००(?) वर्षांनी अपोलोनिअस (of Tyrna) भारतात ज्ञानार्जनासाठी आल्याचा उल्लेख सापडतो. हा उल्लेख पाश्चात्य लेखांत तसेच स्वतः अपोलोनिअसने केलेल्या भारताबद्दलच्या वर्णनात सापडतो. मांडुक्य उपनिषदातही अपुलनिय असा त्याचा उल्लेख आढळतो.

पायथॅगोरसही भारतात अध्ययनासाठी राहून गेल्याचे वाचले आहे.

====

डिसक्लेमरः हे वर्तकिय ज्ञान नसून वाचनात आलेल्या गोष्टी आहेत. खऱ्या खोट्याची सत्यासत्यता तपासून पाहणे शक्य झालेले नाही. याबाबत अधिक माहिती मिळाल्यास मदत करावी.

चू. भू. दे. घे.

====

भोमेकाका,

म्हणण्याचे इतर काही कारण असेल असे वाटत नाही. अशी अनेक उदाहरणे सांगता येऊ शकतील असे वाटते. असो.

याबद्दल अधिक सांगू शकाल का? किंवा दुवा देऊ शकाल का?

प्रियाली.