गोविंदा निवडणूकीला उभा राहिला तेंव्हा त्याचे सामाजिक आणि/अथवा राजकीय कार्य काय होते? जर का ते शून्याच्या जवळपास असूनही मतदारांनी त्याच्या पदरात भरघोस मते टाकली असतील तर त्यात गोविंदाची चूक ती काय? मतदार नादान आहेत असे म्हणण्याशिवाय पर्याय उरत नाही.

केवळ कलाक्षेत्रातल्या लोकप्रियतेच्या जोरावर कलावंतांना खासदार-आमदार म्हणून लोकसभेवर-विधानसभेवर निवडून देणे हे लोकशाहीला घातक आहे असे वाटते.

महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील राज्यात अश्या पार्श्वभूमीचे लोक मुख्यमंत्री सुद्धा झाले आहेत. पण जेंव्हा ते पहिल्यांदा निवडून आले तेंव्हा त्याचे सामाजिक-राजकीय कार्य जर का शून्य असेल तर तो मतदारांचा नादानपणा आहे, उमेदवाराचा नाही असे वाटते. कारण भारतीय घटनेने किमान पात्रता पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे.

पण लोकसभा-विधानसभा अश्या लोकशाहीच्या दृष्टीने सर्वोच्च सभागृहात आपल्या हितांचे रक्षण करणारा उमेदवार पाठवायचा किंवा पडद्यावर विचित्र अंगविक्षेप करत नाचणाऱ्या नटाला किंवा अश्या प्रसिद्ध नटाशी विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या नटीला हे मतदारांना कळायला हवे.