य र ल व श ष स ह वगैरे व्यंजनांच्या आधी असलेल्या अक्षरावरच्या अनुस्वाराचा उच्चार करताना ते अक्षर अनुनासिक उच्चारले जाते तसेच त्यात पुढील व्यजनाच्या उच्चाराचा अंश मिसळला जातो, ज्यामुळे त्या व्यंजनाच्या उच्चारावर आघात होतो.
उदाहरणार्थ
संयत - स् अंय् यत
संरक्षण - स् अंर् रक्षण
संलग्न - स् अंल् लग्न (त्यामुळे उच्चार सानुनासिक सल्लग्न च्या जवळ जातो व ल वर जास्तीचा आघात होतो)
संवर्धन - स् अंव् वर्धन
सिंह - स् इंह् ह
वगैरे.