(तुम्हांला आवडत नसले तरी आणि तुमच्या दुर्दैवाने माझ्यात अज़ून तुमच्याविषयीचा आदर कायम आहे म्हणून 'आदरणीय')चित्तोपंत,
इच्छा नसतानाही, केवळ तुमचे काही (गैर)समज़ दूर करण्याचा आगाऊपणा करण्याची खुमखुमी आली, म्हणून कार्यालयीन व्यापातून वेळात वेळ काढून (हवे तर 'ज़ाणूनबुज़ून' म्हणा!) लिहितोय.
'हे' काय आहे? आवर. एकीकडे 'आदरणीय सर' दुसरीकडे 'हे'.
--- तुम्ही टीका केली होती. तुम्ही केलेल्या टीकेनंतर मी माझे स्पष्टीकरण दिले होते. प्रकरण संपले. पण त्या स्पष्टीकरणाला स्वसोयीने 'चिथावणी' समज़ून आणि रचनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या वरील प्रतिसादातून लेखनावरची गाडी वैयक्तिक भांडणावर आणून तुम्ही बेज़बाबदारपणाचे उत्तम उदाहरण दिले आहे. ज्या गोष्टी मुद्द्याशी असंबद्ध आहेत, त्या व्यक्तिगत पातळीवर बोलण्याऐवजी जाहीर बोलणे, या अशा वागण्याची कीव करावी की जाहीर सत्कार हे तुम्हीच सुचवावे. आणि एकीकडे वाद घालायचा नाही म्हणणे आणि दुसरीकडे एका स्पष्टीकरणास सोईस्करपणे चिथावणी मानणे, याला काय म्हणावे तेही सांगा.
बेरकीपणा म्हणावा की नाटकीपणा.
--- खरे तर या दोन्ही पैकी काहीच म्हणण्यासारखे नाही; तुम्हांला जे म्हणायचे आहे, ते म्हणायला तुम्ही मुखत्यार आहातच. तुमचे तोंड धरणारा मी कोण?!
हा सरबिरचा मेलोड्रामा आधी बंद करावा.
--- कृपया या प्रतिसादाचा मायना पहा.
फणश्यांनी किंवा प्रवाश्यांनी इथे काय म्हटले आहे ते सांगत बसू नये. ज्याला आत्मविश्वास नसतो तो दुसऱ्यांच्या मतांची, प्रतिसादांची कुबडी घेतो.
--- आपलेच म्हणणे ज़र कोणी वेगळ्या पद्धतीने मांडले असेल तर त्याचा संदर्भ स्वतःच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ देणे याला 'कुबड्या घेणे' म्हणता येत नाही, हे तुमच्यासारख्या थोर कवी कम टीकाकारास कळू नये, हे दुर्दैव आहे. अशा खोडसाळ विधानातूनच तुमच्या मूळ टीकेचे प्रयोजन कळते.
टीका सहन होत नसेल तर कवीने आपल्या कवितांचे बाड रोज रात्री गालावर लावून झोपावे. कविता सार्वजनिक करू नयेत. असे माझे मत आहे.
--- तुमचे मत आहे ना? मग ठीक आहे. अहो, कविता कोणी कोठे कशा प्रकाशित कराव्यात/करू नयेत, हे ज्यांचे त्यांना ठरवू दे की! त्याबाबत तुमचा सल्ला विचारला तर द्या ना आनंदाने. हवे तर फ़ी घ्या त्याबद्दल. पण हा मुद्दा त्या त्या कवीचा खाज़गी मामला आहे. त्यात ढवळाढवळ कशाला?
वर्षानुवर्षे गोत्यावळ्याने, काका-काकूंनी, भावकीने हरबऱ्याच्या झाडावर चढवले किंवा बरे वाटावे किंवा चुचकारण्यासाठी म्हणा समर्थनार्थ दहा 'वा, वा, छान, छान' प्रतिसाद आले म्हणजे कृतार्थ होणारा तो 'बनचुका' कवीच.
--- काकाकाकू, गोतावळा, भावकी यांना कशाला मध्ये आणताय हो? माझ्याशी काय ते बोला ना! जयंतराव, शीलाताई, पापळकरशेठ, टगोजी, सातीताई, गोळेकाका, तात्या, फणसे साहेब, प्रवासीपंत, अजबराव, खांडेकर साहेब, यांपैकी मी कुणाला ज़वळूनही ओळखत नाही; ना त्यांचाशी बोललो आहे; ना त्यांना भेटलो आहे. त्यामुळे या कवितेला ज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, ते माझ्या गोतावळ्यातले, नात्यातले, भावकीतले नाहीत. आणि बाकीच्यांनी म्हटलेच वावा, छान तर त्यात तुम्हांला वाईट वाटण्यासारखे/राग येण्यासारखे काय आहे?; कारण भले काही असो. त्याचा विचार माझ्यावर सोडून द्या ना!
त्याने आधी मनोगताबाहेर जाऊन थोरामोठ्यांना कविता दाखवाव्यात आणि आपली पायरी ओळखावी.
--- कविवर्य, मी व्यावसायिक/धंदेवाईक कवी नाही. माझ्या कविता/गझला कोणाला आवडल्या/नाही आवडल्या, तर त्यामुळे माझे दोन वेळचे जेवण कमीजास्त होत नाही. स्वानंदासाठीच्या लेखनातून आणि ते लेखन इतरांपर्यंत पोचण्यातून मला ज़र काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळत असतील तर तो माझ्यासाठी 'बोनस' आहे. मनोगतावरच तुमच्यासारख्यांकडून इतके शिकायला मिळाले आणि मिळते आहे, की बाहेर कुठे ज़ायची गरज़ कधी भासली नाही. आणि माझे पोट कवितांवर अवलंबून नसल्याने, मला कविता/गझला यात डॉक्टरेट मिळवायची नसल्याने अगर ज्ञानपीठ वा तत्सम मानसन्मान मिळवायचे नसल्याने माझ्या कविता घेऊन थोरामोठ्यांकडे शिकवण्या लावणे, त्यावर महान कवीजनांची मते घेणे कधी गरज़ेचे वाटले नाही. असा काही बेत असल्यास नक्कीच थोरामोठ्यांकडे ज़ाईन. तुमच्या घरी येतो सगळ्यात पहिल्यांदा. म्हणजे इतरही ज़णांचे पत्ते, दूरध्वनी क्र. वगैरे मिळतीलच, काय!?
माझ्या बाज़ूने (तूर्तास) एव्हढेच आणि पुढील नम्र पुरवणी विनंत्याः
१) कवितेशी संबंधित नसलेली प्रकरणे जाहीरपणे चघळून स्वतःचा (आणि माझा तसेच इतर मनोगतींचा) अमूल्य वेळ आणि इथली ज़ागा वाया दवडू नये
२) माझ्या या प्रतिसादाचे अधिक्षेत्र नि आवाका तुमचा वरील प्रतिसाद आणि प्रस्तुत कवितेवरील साधकबाधक चर्चा यापलीकडे नाही, याची ज़ाणीव ठेवावी.
(अज़ूनही तुमचाच स्वघोषित विद्यार्थी)चक्रपाणि