मतदान करणे हे लोकशाहीतील प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे असे वाटते. निवडणूकीच्या वेळेस जेंव्हा जेंव्हा माझ्या मतदारसंघात होतो तेंव्हा तेंव्हा मी मतदान केले आहे.
मतदान न करता राजकीय नेते, पक्ष आणि संघटनांवर भले-बुरे भाष्य करण्याचा नैतिक (घटनात्मक नव्हे) अधिकार मला आहे असे वाटत नाही.
मतदानाचे महत्त्व समजावण्यात पालक आणि आजूबाजूचे वडीलधारे लोक फार मोठी भूमिका बजावतात असे वाटते.