उच्चार ऐकणाऱ्यास खटकले तरी करणाऱ्यास खटकले नाहीत तर त्यात सुधारणा होणार नाही.वंश,सिंह,इ. शब्दांचा उच्चार आपण बरोबरच म्हणजे 
वअंश, सिंव्ह  वगैरे करतो पण सर्वाना ते आवश्यक वाटत नाही (जसे शुद्धलेखनचिकित्सा उपलब्ध असून मनोगतवर अशुद्ध लिहिले जातच आहे.)उत्तर भारतीय पहिले अक्षर सने सुरू होणारे जोडाक्षर असेल तर इ लावल्याशिवाय उच्चारू शकत नाहीत जसे स्क्रू चा उच्चार इस्क्रू च करणार (त्याला अटलबिहारीजीसुद्धा अपवाद नाहीत).यावर माझ्या एका म.प्र.मधील सहकाऱ्याशी बोललो तेव्हा तो म्हणाला "हमको वैसाही सिखाया जाता है।"म्हणजे स्त्री चा उच्चार इस्त्री असाच शिकवला जातो.आता यावर मी काय बोलणार?