आजकाल फक्त जनसंपर्क एवढ्याच भांडवलावर कुणी निवडून येऊ शकत नाही ही दुःखद परिस्थिती आहे. पैसा खर्च करायची तयारी, जातीबांधवांचे पाठबळ आणि कार्यकर्त्यांबरोबर गुंडांचीही फ़ौज या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात.

दुर्दैवाने खरे आहे. पण म्हणून प्रामाणिकपणे, तळमळीपोटी आणि केवळ जनसंपर्काच्या आधारावर ('भांडवल' हा शब्द वापरू इच्छीत नाही) निवडून येणाऱ्याची किंमत यत्किंचितही कमी होत नाही. (कदाचित वाढतेच!)

या तीनही गोष्टी नसताना ती निवडून आली कारण तिची काहीतरी चांगले करण्याची तळमळ आणि लोकांना मिळालेला नवा चांगला पर्याय!

कौतुकास्पद गोष्ट आहे.

- टग्या.