मतदान न करता राजकीय नेते, पक्ष आणि संघटनांवर भले-बुरे भाष्य करण्याचा नैतिक (घटनात्मक नव्हे) अधिकार मला आहे असे वाटत नाही.
असहमत! आपल्या आयुष्यावर ज्या गोष्टींनी फरक पडतो, त्यावर मत असण्याचा, भाष्य करण्याचा नैतिक अधिकार प्रत्येकास आहेच. (घटनात्मक असो किंवा नसो.) मतदान करणे हा निवारणाचा एक प्रयत्न झाला. तो करावाच, पण तो न केल्याने त्यावर भाष्य न करण्याचा अधिकार तसूभरही कमी होत नाही. (हा प्रकार वक्तव्यस्वातंत्र्याखाली यावा का?)
घरात चोरी झाली तरी बऱ्याचदा (विशेषतः चोरी मामुली असेल तर) आपल्याकडे (पोलिसांची कटकट नको म्हणून) तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. पण म्हणून झाल्या चोरीबद्दल दुःख किंवा चोराबद्दलचा संताप व्यक्त करू नये का?
- टग्या.