परभाषेतल्या शब्दांचे उच्चार ते मराठीत असते तर कसे झाले असते ह्या सर्वसाधारण भावनेतून होतात असे वाटते.

केरळ, तमिळनाडू ह्यातील ळ मूळ भाषांत आहे असे म्हटले तरी नेपाळ मधील ळ मूळ भाषेत आहे का? कृपया खुलासा करावा.

साधे "तू काम कर" हे वाक्य घ्या. हे हिंदीत आणि मराठीत जसेच्या तसे आणि त्याच अर्थाने वापरले जाते.

मात्र हिंदीत कर ह्या शब्दाचा उच्चार क्‌र् असा होतो (क आणि र दोन्ही अगदी कमी वेळ उच्चारले जातात) आणि मराठीत कर चा उच्चार कऽर् (क किंचित लांबवलेला आणि शेवटचा र अर्धा असल्याप्रमाणे. ( हिंदीत क̮र̮ आणि मराठीत क̱र̮  असे काहीसे.)

कप हा शब्द इंग्रजीत क̮प̮ असा तर मराठीत क̱प̮ असा उच्चारला जातो. सर्वसाधारणपणे ज्या शब्दाची शेवटची दोन्ही अक्षरे अकार आहेत तेथे उपान्त्य अकार मराठीत किंचित लांबवला जातो. पाहा पटते का माझे मऽत !