मागच्या सुट्टीत घरी असताना नेमक्या निवडणूका होत्या. 'मृदुला' हे नाव नसले तरी तसेच काहीतरी दिसणारे एक नाव माझ्या आईबाबांच्या नावाखाली होते. त्याजोरावर पॅन कार्ड दाखवल्यावर मला मतदान करता आले. आमच्या भागातून पुष्कळ मतदान झाले. शिवाय निवडून आलेल्या उमेदवाराने लगोलग रस्ते वगैरे बांधायलाही सुरूवात केली. त्यामुळे लोकांना मतदानाचे महत्व आपोआपच कळले.