काहीच न करण्यापेक्षा योग्य दिशेने चालत राहणे बरे असे मला वाटते.
मी (त्यातल्या त्यात) चांगल्या पक्षाच्या उमेदवाराला मत देतो. तसेच इथल्या स्थानिक उमेदवाराचा केंद्रातील सत्तेच्या संख्याबळावर 'एक' इतका परिणाम होणार आहे आणि केंद्रात सुद्धा योग्य पक्षच आला पाहिजे असा लांबवरचा :)विचार सुद्धा त्यावेळी करतो.
राजकीय कारकीर्द काहीच नाही.
पण मतदानाच्या दिवशी सकाळी आसपासच्या (सुज्ञ, जाणत्या अशा) लोकांच्या घरी जाऊन त्यांना मतदानाला जाण्याचा आग्रह (काही वर्षे) केला आहे. त्याचा मोठा परिणाम होतो असे माझे मत आहे.
त्यांना मतदानाचा क्रमांक शोधून देणे, केंद्र कोठे आहे ते सांगणे वगैरे सुद्धा केले आहे. आताही संधी मिळताच करीनच.
[मागल्या वेळी नाव नसल्याने पुढल्या वेळी ते योग्य ठिकाणी नोंदवण्याचे पत्रक मिळताच माझे आजोबा त्या लोकांना जाऊन नाव नोंदवण्याचा आग्रह करित असतात. ते अशा घडामोडींवर लक्ष ठेऊन असतात.]
एक अब्ज मधला 'एक' नागरिक,
--लिखाळ.