भोमे काका, अगदी बरोबर!!

राम नाईक यांच्यासारख्या काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून न देता थिल्लर डान्स करणाऱ्या गोन्दयाला लोकांनी निवडून दिले. आता भोगा ...

मध्यम वर्गीयांनी राजकारण्यांना शिव्या द्यायच्या आधी हे बघितले पाहिजे की त्यांना आपणच निवडून दिले आहे. बदलू पण आपणच शकतो. अर्थात मतदान केले तर!! ............. नाहीतर भोगा ...

मतदान करणे किती गरजेचे आहे हे ते न करणाऱ्या लोकांना कळतेच आहे .. पण ते करणाऱ्या लोकांना पण कळले पाहिजे की योग्य माणसाला ते झाले पाहिजे.

माझी आजी मला सांगते की आमच्या गावाकडे अजूनही इंदिरा गांधी आहे समजून पंजा ला मतदान होते. तसेच काही लोका सोनियाच्या style मुळे तिलाच इंदिरा गांधी समजतात.

ती गरीब लोकांची चूक आहे का माहीत नाही पण त्यांना शिकवले तर ते आपल्या मनाने योग्य निर्णय घेऊ शकतील असे मला वाटते.

रिकामा डोकं, रिकामे हात, रिकामे पोट हे धोकादायकच म्हणायचे लोकशाहीला ....