तुझा "उत्तर" हा प्रतिसाद हा समतोल होता. पण "अमान्य"वरील या प्रतिसादातील वरील वाक्ये अत्यंत आक्षेपार्ह व खोडसाळ आहेत. धंदेवाईक अथवा ज्यांचे जेवण लेखनावर अवलंबून आहे त्यांनीच फक्त आपल्या लेखनात सुधारणा कराव्यात ( किंवा दुसऱ्याच्या ऐकाव्यात) असे तुझे म्हणणे आहे काय?
------ असे माझे म्हणणे मुळीच नाही. किंबहुना ते तसे नाही, म्हणूनच मी आतापर्यंत चित्तोपंतकडून आणि क्वचित प्रसंगी इतरांकडूनही वेळोवेळी मार्गदर्शन घेत आलो आहे. पण मनोगताबाहेर ज़ाऊन थोरामोठ्यांचे मार्गदर्शन घ्यावे, स्वतःची पायरी ओळखावी , अशी विधाने करून चित्तोपंतांना मी कवितेच्या क्षेत्रात नाव/पैसा/यश/प्रसिद्धी मिळवण्याच्याच मागे आहे, असे वाटत असल्याचे प्रतीत होते आहे, असे मला दिसते. तसे असेल, तर तो त्यांचा गैरसमज़ आहे,हेच सांगण्याचा माझा प्रयत्न होता. मनोगतावर मी लिहिलेल्या रचनांमधून किंवा कोणत्याही प्रतिसादातून मी स्वतःची टिमकी मिरवण्याचा प्रयत्न केला असेल, तर माझ्या निदर्शनास आणून द्यावे. तुम्ही ज़े म्हटले आहे, ते मला मुळीच म्हणायचे नव्हते. आणि माझ्या लेखनातून तसे प्रतीत होत असेल, तर त्याची पूर्ण ज़बाबदारी मी स्वीकारतो आणि माझ्या वरील प्रतिसादाबाबत चित्तोपंतांची तसेच अपमानित झालेल्या समस्त कवीजनांची मनोगतींच्या साक्षीने जाहीर माफ़ी मागतो.

लेखनावर पोट अवलंबून असणारे लेखक- कवी हे टीकाकारांचे मिंधे असतात आणि तसे नसलेले तुझ्यासारखे लोक कोणाचेच ऐकायला बांधील नसतात असे तुझे म्हणणे असल्यास ते चुकीचे आहे. तुझ्या वाक्याला उर्मटपणाचा दर्प येतो आहे आणि लेखनावर जगणाऱ्या अनेक लेखकांचा - कवींचा (उदा. गो. नी. दांडेकर) या वाक्यात तू अपमान केला आहेस ही अत्यंत वाईट गोष्ट आहे.
---- दांडेकरांसारख्या मोठ्या नावांच्या तुलनेत मी कोणीच नाही; नसेनही. त्यांच्या इतिहासाबाबतही मी पूर्ण अनभिज्ञ आहे. सबब, माझ्या हातून त्यांचा व ज्या अज्ञात कवींचा अपमान झाला आहे, त्याबाबत मी जाहीर माफ़ी मागतो व दिलगिरी व्यक्त करतो.अशी खोडसाळ/आक्षेपार्ह विधाने जी मी केली आहेत, ती मी मागे घेत आहे. पुनश्च क्षमस्व.

 
चित्त किंवा इतर कोणीही कवितेवर टीका करतात ती तुझ्या कविता/गज़लेत सुधारणा व्हावी म्हणून.
----- पूर्ण मान्य आहे. पण टीका करताना/सुधारणा सुचवताना पायरी ओळखायला सांगण्यामागचे प्रयोजनही मला सांगावे. मी चित्तोपंतांच्या टीकेला दिलेले उत्तर हे कोणाची पायरी दाखवून देण्यासाठी/लायकी काढण्यासाठी किंवा त्यांचा किंवा इतरही कुणाचा अपमान करण्यासाठी मुळीच दिले नव्हते. किंबहुना त्यांच्या टीकेतील शब्दबंबाळपणाचा आरोप, मी निवडलेल्या शब्दांशी तसेच अभिव्यक्तीच्या मार्गाशी त्यांचे सहमत नसणे, याचाही मीस्वीकार केला आहे. त्यांच्या टीकेतील मी स्वीकृत केलेले हे मुद्दे विसरून माझी पायरी/लायकी काय, याबाबत प्रश्नचिन्हे उभी करण्याचा/विधाने करण्याचा हेतू/आवश्यकता काय? मी माझ्या किंवा इतरांच्या पायरीबाबत/दर्जाबाबत/श्रेष्ठत्त्वाबाबत कधीच कुठले विधान केले नाही, करणारही नाही. कारण मी ज़ाणकार नाही, मला तेव्हढा अधिकारच नाही. पण याआधी चित्तोपंतांनी कधी कुणाची पायरी ओळखण्याची भाषा केली नाही. मग याच वेळी मला तोफेच्या तोंडी देण्याचे कारण काय? त्यांच्याकडून खूप शिकायला मिळते, हेही १०१% खरेआहे. त्यांनी मला वाट्टेल ते बोलावे/ऐकवावे. पण माझे आप्तस्वकीय, भावकी, मित्रपरिवार (अधोरेखित शब्दाचे माझ्या आयुष्यातील महत्त्व/व्यक्तिगत संदर्भ फारच कमी लोक ज़ाणतात, कदाचित तुम्हीसुद्धा. मी ते केवळ सार्वजनिक व्यासपीठाचे संकेत आणि चित्तोपंतांविषयीचा पूर्ण आदर यापायी डावलले आहेत. अन्यथा  अन्य कोणत्याही परिस्थितीत, कोणाकडूनही अशी विधाने केली गेली असती, तर मी खरोखरच माझी पायरी सोडली असती, हे खरे. असो) यांच्यावर घसरण्याचा ज़ो प्रकार त्यांनी केला आहे, त्याला काय समज़ायचे? चित्तोपंतांना मी सोडून इतरांवर घसरायचे तसूभरही कारण नव्हते आणि नसावे.

तुला सुधारणा करायची असेल तर कर नसेल करायची तर करू नकोस. पाहिजे तर सुमार कवितांचे समर्थनही कर, स्वान्तसुखाय लिहितो म्हणून. पण धंदेवाईक कवी नसल्याची किंवा त्यावर पोट अवलंबून नसल्याची जाहिरात करून/ कारणे सांगून /टिमकी मिरवून लेखनावर जगणाऱ्या स्वाभिमानी लेखकांचा अपमान करण्याचा अधिकार तुला कोणी दिला?
--- मला असा कोणताच अधिकार नाही, हे मी आधीच सांगितले आहे. तेव्हा हे विधान कोणत्या भूमिकेतून लिहिले गेले आहे, याची तुम्हांला कल्पना आली आहे, असे गृहीतधरतो. या विधानातून कोणाचा कोणत्याही प्रकारचा अपमान झाला असेल, तर तो हेतूपुरस्सर नाही, एव्हढे नक्की सांगू शकतो.
 
दुसरे म्हणजे मला "गज़लेत डॉक्टरेट/ज्ञानपीठ मिळवायचे नसल्याने...." हे वाक्य आळशी व आडमुठ्या विद्यार्थ्यासारखे वाटते. डॉक्टरेट/ ज्ञानपीठ जाऊ दे. कुठलीही परीक्षा नुसती पास जरी व्हायचे असेल तरी शिक्षक सांगतील तसा अभ्यास करायला नको का?
--- हा तुमचा आक्षेप पूर्ण मान्य आहे. याविषयी आधीच काय ते सांगितले असल्याने मीअन्य कोणतेही भाष्य करणार नाही.

तुमच्याकडून ज़हाल , स्पष्ट प्रतिसाद आला आहे, याचा आनंदच आहे. चित्तोपंतांच्या टीकेतून नाही, पण निदान तुमच्या प्रतिसादातून तरी, माझी पायरी मी ओळखावी, ही चित्तरंजन सरांची सदिच्छा नक्कीच पूर्ण झाली असेल. कदाचित तुम्ही ज़े सांगताय, त्यांनाही तेच सांगायचे असेल, असे गृहीत धरतो.
चित्तोपंत व विनायककाका, चूक झाली. आतापर्यंतच्या लेखनाबद्दल व प्रतिसादाबद्दल कान पकडून माफ़ी मागतो. याउप्पर काय करू शकेन माहीत नाही. तेव्हा मोठ्या मनाने माफ करावे, ही नम्र विनंती.

(क्षमाप्रार्थी)चक्रपाणि