परभाषेतल्या शब्दांचे उच्चार ते मराठीत असते तर कसे झाले असते ह्या सर्वसाधारण भावनेतून होतात असे वाटते.
हो, प्रत्येक भाषेत असेच होत असते असे वाटते. पारीचे ह्या शब्दाच्या उच्चाराचे इंग्रजीकरण (एँग्लिसायज़ेशन) पॅरिस आहे. ते ह्याच भावनेतून झाले असावे. फ़्रेंच, जर्मन आणि इंग्रजी आदी भाषांची लिपी एकच असल्याने त्यांना उच्चारानुसार शुद्धलेखन करण्याची तशी गरज नाही. असे असले तरी विशिष्ट जर्मन आणि फ्रेंच उच्चारांसाठी काही खास चिन्हे आहेत, असे वाटते.
केरळ, तमिळनाडू ह्यातील ळ मूळ भाषांत आहे असे म्हटले तरी नेपाळ मधील ळ मूळ भाषेत आहे का? कृपया खुलासा करावा.
नेपाळीत 'ळ' आहे असे वाटते. नेपाळी भाषेवर राजस्थानी भाषेचा प्रभाव आहे.राजस्थानी भाषेत 'ळ' च्या आसपासचा स्वर आहे, असे वाटते.
सर्वसाधारणपणे ज्या शब्दाची शेवटची दोन्ही अक्षरे अकार आहेत तेथे उपान्त्य अकार मराठीत किंचित लांबवला जातो. पाहा पटते का माझे मऽत !
होहो. मराठी स्वेटऽर आणि कूलऽर वेगळा!