च वर्णातील अक्षरे उच्चारताना जीभ मुर्ध्यावर आपटते. (मुर्धा म्हणजे टाळू आणि पटाशीचे दात यांच्या मधला खडबडीत भाग.) मुर्ध्याच्या पुढच्या टोकावर जीभ आपटली तर तुम्ही दंत्य म्हणालात तसा उच्चार होतो. आणि मुर्ध्याच्या मागच्या टोकाचा वापर झाला तर "दंत्यतालव्य" सारखा उच्चार होतो. हे च वर्णातील पाचही अक्षरांना लागू होते (ञ सह). म्हणून
उंच चा उच्चार उन्च असा न करता उञ्च असा केला पाहिजे.

अवांतर - त वर्णातील अक्षरे दंत्य आहेत तर ट वर्णातील अक्षरे तालव्य आहेत.