सर्वांचे मनःपूर्वक आभार!

प्रियालीदेवी,

गृहीतकांस पुष्टी दिल्याबद्दल पुन्हा धन्यवाद. मला पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक वाटतं पण असले काही विचित्र प्रकार पाहून मौजही वाटते. असो. खड्ड्यांचं म्हणाल तर येथे रस्त्यात खड्डे नसून खड्ड्यातून अधून-मधून रस्ते उगवतात. त्यामुळे त्या कडांवर उड्या मारल्याने सगळे रस्ते नीट समतळ होतील, :)

सन्जोप राव,
टिका पाश्चात्य देशावर नसून खुळचट प्रकारावर आहे. हा प्रकार तेथे घडत असल्याने उल्लेख केला एवढेच. त्यामुळे प्रियाली ह्यांनी ते मनावर घेतले नसेल, :)

अनुताई,

अजूनही एक मोठी संधी आहे बरं का! भारताच्या कल्याणासाठी आपण १ ऑगस्टला उडी मारू शकता, :)

(उडीच्या विचारांनी चिंताक्रांत) शैलेश