जयंत, लग्न झाल्यावर हृदयस्वामिनी असूनही ती एक नजरकैद असते. मी आधी म्हटल्याप्रमाणे, आपल्याकडे हे फ़ारच कमी दिसतं. कित्येक बायकांना कपडे काय घालायचे हे सुद्धा आपल्या नवऱ्याला विचारावं लागतं. ती कोणाशी कशी बोलते, काय बोलते....... ह्यावर सुद्धा त्याचं बारीक लक्ष असतं.
जनक हा परका कधीच नसतो हो. पण तिची वाढ, मित्रमंडळ, शिक्षण, लग्न हे सगळं जनकाच्याच हातात असतं. तिचे हे निर्णय बहुतांशी जनकच घेतो. ते चांगले असले तर काही प्रॉब्लेमच नाही हो. पण (पुन्हा पुन्हा तेच सांगतेय) अहो, कितीतरी समाजात वडील फ़क्त आपल्या सोयीसाठी आपल्या मुलीला नरकात ढकलतात अगदी हक्क असल्यागत. म्हणून तसं लिहिलंय.