भारतीय रूढ रूप वापरणे अधिक योग्य आहे असे मला वाटते.
आता कुठले रूप नक्की रूढ आहे ह्यावर एकमत होणे कठीण. सगळेच भारतीय, मराठी भाषक सगळ्याच इंग्रजी शब्दांचा एकसारखा उच्चार करतात असे नाही.

किंबहुना परदेशी शब्द परदेशी उच्चारात म्हणणे हे कृत्रीम आहे असे माझे मत आहे.
सवाल उच्चारांचा नसून उच्चारांनुसार शुद्धलेखनाचा आहे. शब्द मूळ भाषेतल्या उच्चारासारखे लिहायला सुरवात केल्यास उच्चारही सुधारतील. हे कृत्रिम वाटणे बंद होईल.

तसेच, सायकॉलजी आणि सिम्बियौसिस सारखे बदल करणे सहज शक्य आहे. ते करावेत असे मला वाटते.