कशासाठी करावी अक्षरांची आर्जवे?
इथे अश्रूंसही चोरी असे बोलायची
वाव्वा. (आणि दोन्ही ओळी/मिसरेही सहज-सोप्या झाल्या आहेत.)
तुझे नसणे असूनी आणि नसता भासणे
कशी समजूत रे माझीच मी घालायची?
वावा..(खालचा मिसरा फारच छान आला आहे. वरच्या ओळीत ओढाताण झाल्यासारखी वाटते आहे. असेच काहीसे गझलेतल्या इतर ओळींबद्दल म्हणता येईल. कल्पनांतली गुंतागुंत स्पष्ट होत नाही.)
गझल छान आहे.