मी मला मताधिकार प्राप्त झाल्यापासून सर्व निवडाणूकांमध्ये जाणीवपूर्वक योग्य उमेदवारास मतदान केलेले आहे. लोकांनाही प्रवृत्त केलेले आहे.

महाविद्यालयीन जीवनात राजकीय पक्षांचे प्रचारही केलेले आहेत.

मात्र, पदवीधर मतदार म्हणून वारंवार पुराव्यानिशी नोंदविलेले माझे नाव अनेकदा यादीतून गायब झालेले आहे. सध्या ते यादीत नाही.

भारतीय लोकशाही आता परिपक्व झालेली असल्यामुळे उच्चशिक्षितांच्या मतांना जादा प्रमाणात प्रतिनिधित्व करण्याची संधी देणारी नवी मतदानप्रणाली अस्तित्वात आणावी असे माझे प्रामाणिक मत आहे. म्हणजे जो जेवढा जास्त औपचारिक शिक्षण घेतलेला असेल तेवढीच त्याच्या मताला जास्त किंमत देणारी व्यवस्था निर्माण करायला हवी आहे. असे झाले तर जे राज्य, प्रशासन कसे असावे, कसे चालावे, चालवावे हे जाणतात त्यांना ते चालविण्याचे वाजवी अधिकार मिळून सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण होईल.