माफ करा मी थोडं स्पष्ट बोलतोय. पण वर दिलेल्या सगळ्याच गोष्टींमधे विशेष असं मला तरी काही दिसत नाही.  म्हणजे उदाहरणार्थ पुढं उभं राहून मोठ्या आवाजात आरत्या म्हटल्यानं मराठीसाठी किंवा या भाषेच्या सद्यःस्थितीसाठी काय केलं गेलं?  असं तुम्ही दिलेल्या वरच्या प्रत्येक मुद्द्याबद्दल म्हणता येईल.  आणि यात "फ़्लाँट" करण्यासारखं तर अजिबातच काही नाही.  ज्यानं खरंच भरीव काही केलंय (म्हणजे उदाहरणार्थ मिलिंद भांडारकरांची अनुदिनी किंवा शब्दभांडार) त्यानं "फ़्लाँट" जरूर करावं, परंतु 'एकादशीचा का उपास हे सांगितलं' यात "फ़्लाँट" करण्यासारखं काय आहे?