मृत्यू म्हणजे खरे तर वेगळे असे काहीच नाही. जणू काही पुढच्या खोलीत मी झोपलेलो आहे आणि मी आहे तसाच आहे आणि तुम्हीही तुम्हीच रहाता. आपल्यातील नातेही तेच आहे. मला अगदी नेहमीप्रमाणे हाक मारा, त्यात ओढून ताणून दुःख, एकाकीपणा आणू नका. आपल्या संवादांतील नर्मविनोद तसेच चालू द्या. सतत घेतले जाणारे माझे नावही कुठलीही दुःखाची कळा न येऊ देता घेत रहा. थोडक्यात आयुष्य आहे तसे चालू द्या. आयुष्याची एकसंधता, सातत्यता आहे तशीच ठेवा. दृष्टीसमोर नसलो म्हणून काय झाले मी मनात तर आहेच ना ? खरे तर थोड्यावेळाने आपलीही भेट होणारच आहे. या मध्यंतरापर्यंत मी इथेच आजुबाजूला, जवळच वाट बघतोय.
अभिजित
( चिंतन करावे असे आहे; धन्यवाद )