मॉर्गनराव,
हे आणि अश्याच इतर गोष्टी प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून
करणे आवश्यक झाले आहे. आपल्या परंपरेचा आणि भाषेचा डोळस
अभिमान असणे सध्या आवश्यक झाले आहे. विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ट्य
आहे, त्यासाठी वेगवेगळ्या परंपरा आणि भाषा टिकणे आवश्यक आहे. त्यामुळे
हे प्रादेशिकवादी वाटत असले तरी विभाजनवादी नाही.
महेशराव, मिलिंदराव यांनी सुरू केलेले उपक्रम आपणास माहीत आहेत. असे
इतर कोणते उपक्रम सुरू आहेत किंवा कोणाला काही उपक्रम सुरू करायचे आहेत
याचीही माहिती या चर्चेच्या निमित्ताने मिळावी असे वाटते.