मत देण्यास पात्र झाल्यापासून आजपर्यंत प्रत्येक निवडणूकीत मत दिले आहे. अगदी लोकसभेपासून ते विधानसभा, महापालिका, विधानपरिषदेचा पदवीधर मतदारसंघसुद्धा. आपले ते काम असताना ते न करणे बरोबर वाटत नाही म्हणून. इतरांचे मत निराळे असू शकते आणि मी तेही समजू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मत दिलेच पाहिजे असा हट्ट नाही.
दोन वेळा पत्ता (शहरसुद्धा) बदलल्यावर माझे यादीतले नावही बदलून घेतले (जुने काढून नवीन घातले). काही अडचण आली नाही.
मत सामान्यतः पक्षाकडे बघून दिले आहे, पण वेळोवेळी वेगळ्या पक्षांनाही दिले आहे (कामगिरी पाहून). फक्त महापालिकेसाठी मात्र उमेदवाराकडे पाहून पक्षाकडे न पाहता मत दिले. असे करण्याचे कारण इतकेच की मला वाटते की राज्य / देश स्तरावर पक्षच जास्त निर्णय घेतात त्यामुळे योग्य पक्ष निवडून येणे महत्वाचे. (याही बाबतीत इतरांचे मत वेगळे असू शकते)
सक्रिय राजकारणात (अगदी मनोगतावरही) अजिबात सहभाग नाही.
आपला (अमानत जप्त) इहलोकी.