तुमच्या मूळ प्रस्तावातल्या पहिल्या वाक्यात तुम्ही असं म्हटलंय की मराठी साठी आपण काय करतो. या पार्श्वभूमीवर "ह्या सगळ्यामागचा उद्देश एकच; मी मराठी आहे आणि "आमच्यात असं असतं" हे सगळ्यांना बोंब मारून सांगणे !" असं बोंब मारण्यानं मराठीसाठी काहीतरी केलं गेलं असं आपल्याला वाटतं का?
आमचा गणेशोत्सव, आमचे शिवाजीमहाराज, आमच्या लताबाई, आमचे पु लं, आमचा जरीपटका, आमचे ज्ञानेश्वर असं तुम्हाला लोकांना सांगावंसं नाही वाटत ? मला वाटतं आणि म्हणून मी वरच्या गोष्टी करतो.
महाराष्ट्रीयन म्हणून मलाही या गोष्टींचा अभिमान आहे आणि मीही माझ्या अमराठी मित्रांना हे सारं ऐकवतच असतो आणि ते स्वाभाविकही आहे. तेही त्यांच्या भाषेतल्या अभिमानास्पद गोष्टी आपल्याला सांगत असतात. यात "फ़्लाँट" करण्यासारखं काय मोठं आहे, हे कळलं नाही.