चांगला विषय.
आपल्याला आपल्या गोष्टींची लाज वाटत नसेल आणि समोरच्याला समजावून देण्याइतकी आपल्या गोष्टींची माहिती असेल तर असलेले प्रेम आणि अभिमान असा प्रकट होतोच.

मी चांगल्या मराठीतच बोलायचा प्रयत्न करतो..(म्हणजे प्राज्ञ मराठी हो!)
तसेच हिंदी भाषिकांशी बोलताना काही विवक्षित शब्दांसाठी इंग्रजी प्रतिशब्दांचा आधार न घेता संस्कृतोत्भव मराठी शब्दांचा आधार घेतो. (उदा. प्राध्यापक. बरेचदा ते(च) शब्द हिंदीतही असतात पण ते लोक नेहमी इंग्रजी शब्दांनाच प्राधान्य देतात.)

मित्रांना इ-पत्र, निरोप देवनागरीतून पाठवायचा प्रयत्न करतो.

पाककृती मनोगतावरून मुद्रित करतो :)
--लिखाळ.