आपण इथे खूप षटकार मारले आहेत. अहो अंबर हा मूळ संस्कृत शब्द आहे, आणि संस्कृत ही मुळात इंडो-युरोपियन भाषांपैकी एक आहे. ती भारतात निर्माण झाल्याचा पुरावा आजतरी नाही. किंबहुना ही आर्यभाषा त्यांच्याबरोबरच भारतात आली याबाबत पुरेसे पुरावे आहेत (अर्थात पु. ना. ओक वा तत्सम मंडळी ते मानत नाहीत) त्यामुळे प्रभाव कोणाचा कोणावर पडला हयाचा निर्णय करणे इतके सोपे नाही. एखादा मुद्दा आपल्या सोयीचा आहे वा खरा असावा असे वाटते म्हणून तो तसा असतो असे मात्र नाही.
वर्तक काय किंवा ओक काय, हे नुसते तर्क चालवणारी मंडळी आहेत. ओकांइतके हास्यास्पद लिखाण दुसरे माझ्या वाचण्यात नाही. सर्वांना विनंती की अशा लेखनाने भारावून जाण्यापेक्षा त्यात पुरावे दिले आहेत का, असल्यास किती विश्वासार्ह आहेत, ज्या लेखांचे/पुस्तकांचे/ उत्खननाचे पुरावे नोंदवले आहेत त्यातील मुद्दे इथे संदर्भ सोडून घेतले आहेत का, हे पाहणे जरूरीचे आहे.
ख्रिस्त हे कृष्ण चे रूप आहे हा अतिभव्य मूर्खपणा 'हरे कृष्ण' पंथाने प्रथम पसरवला. अलिकडे हा जणू सर्वमान्य होऊ लागला आहे.
(डोळस देशाभिमानी) - विचक्षण