कविता बरी आहे पण

प्रयत्नपूर्वक शिवले होते
पुन्हा उसवले.
हृदय फाटले दुःख आतले
वाहू लागले.

वाहू लागले वृत्तात बसत नाही.

जाणिवपूर्वक जपली होती
वीण आतली.
जाता जाता मागुन पण तू
हाक मारली.

जाणिवपूर्वक मागुन चूक. मारली चूक. मारलीस हवे.

स्थितप्रज्ञ होण्याचा कित्ती
प्रयत्न केला.
ओली हळवी किनार पाहुन
तोही फसला.

कित्ती बायकी वाटते बुवा. पाहुन चूक.

एकंदर प्रयत्न फसला बुवा.