डॅनियल जोन्ज़ ह्यांची तुम्ही सांगितलेली डिक्शनरी मला माहीत नव्हती. पण उच्चार हे वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) असतात व मानावेत, आदेशात्मक (नॉर्मेटिव्ह) नव्हेत.

उच्चारावरील ह्या विचाराबद्दल बद्दल दुमत असण्याचे कारण नाहीच.

माझ्याकडे ऑक्सफर्ड डिक्शनरीची सीडी आहे. उच्चार वाचून दाखवण्यासाठी त्यात दोन ब्रिटिश आवाज वापरले आहेत. त्यातला एक आवाज ऍ चा उच्चार ऍ आणि आ च्या मध्ये करतो तर दुसरा आवाज ऍ चा उच्चार जवळपास भारतीय उच्चारासारखाच करतो. कारण शेवटी उच्चार हे डिस्क्रिप्टिव आहेत.

हे असे असले तरी लिहिताना मात्र आम्हाला एक रूप स्वीकारायला हवे.

पॅरिस हा उच्चार इंग्रजीत रूढ झाला आहे. आणि तसे मी चर्चा सुरू करताना नमूदही केले आहे.

गावाचे नाव सोडल्यास जेव्हा एखाद्या सिनेमाच्या नावात, किंवा पुस्तकाच्या नावात तो शब्द आला तर त्याचा उच्चार पारी व्हायला हवा, असे वाटते.

चित्तरंजन