माझ्या आठवणीप्रमाणे सावरकरांच्या अंधश्रद्धानिर्मूलक कथांपैकी एकात असे वाचल्याचे आठवते (नक्की आठवत नाही). पण ते पात्र 'भटजी' चे आहेत आणि जवळजवळ ओकांसारखे तर्कट आहे. सावरकरांचे तसे मत असावे असा ग्रह कुणी करून घेऊ नये म्हणून थोडा खुलासा.
आपण नेमके लिहिले आहे, पण तरीही हे लिहितो, कारण सावरकरांच्या दुर्दैवाने आणि काही संघटनांच्या करामतीमुळे आज सावरकर हे आपल्याला फ़क्त हिंदुत्ववादी म्हणून माहीत आहेत, त्यामुळे ते असला वेडगळ तर्क करू शकतील असे वाटू शकते परंतु सावरकरांबद्दल कुणाचा तसा समज असेल तर त्यांचे लिखाण प्रथम वाचावे ही कळकळीची विनंती.
(विषयांतरतज्ञ) - विचक्षण