काही लोकांचा इतका टोकाचा विचार पाहून आच्छर्य वाट्ते..
बरेच लोक महाराज/स्वामी ह्यांना पूर्वग्रह दूषित करून पाहतात असे वाटते. आणि त्यांवरून ढोबळ अंदाज, अनुमान, निष्कर्ष काढतात. आणि त्यांवरून वाद होतात.
जगात जसे, चांगले - वाईट लोक असतात तसेच सज्जन - दुर्जन महाराज/स्वामी असतात. कोणती ही व्यक्ती चांगली - वाईट हे काही माहिती नसताना देणे म्हणजे अंधारात गोळी मारणेच आहे.
असुरक्षिततेची भावनेने खूपच कमी लोक महाराज/स्वामी यांजकडे जातात असे मला वाटते.
माझ्या मते, बऱ्याच जणांना आयुष्यात गुरुची गरज असते. (आता गुरुंची गरज का? ह्या मोठ्या विषया चे स्पष्टीकरण बऱ्याच धार्मिक ग्रंथात सापडेल)
बऱ्याच जणांना आध्यात्मिक प्रचन, कीर्तन इत्यादीची आवड असल्याने ते महाराज/स्वामी यांज कडे जातात.
तर काहीजण दिखावा म्हणून जातात.
अशी अनेक कारणे आहेत.
व्यक्ती तितक्या प्रकृती!