मनोगताचा आजचा पसारा तांत्रिक दृष्ट्या सबल असणाऱ्या काही जणांच्या आवाक्यातला वाटतो. परंतु पुढेमागे स्केलिंग (प्रतिशब्द?) चा प्रश्न येईल. प्रशासकांचा काहीतरी मनसुबा असेलच. आपण मात्र वेळोवेळी त्यांना मदतीच्या तयारीची आठवण करीत राहू.
आर्थिक मदतीसाठी मी तयार आहे.
मनोगतावर आपण सगळेच सक्रीय सामाजिक काम करण्याबाबत कुंपणावर आहोत. काही जण प्रत्यक्ष करणारे आहेत, काही करून चुकलेले आहेत, काही मधूनमधून करतात तर काहींना करायचं आहे; पण सोबत हवी आहे. फ़क्त बोलण्या / लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष काही करायला हवं हा सूर अधूनमधून लागतोच. या निमित्ताने एखादा सामाजिक प्रकल्प हा आपण मनोगताचा 'विषय' करावा. तेथे या अल्पस्वल्प आर्थिक मदतीबरोबरच ज्यांना शक्य आहे त्यांनी पाळीपाळीने गट करून शारीरिक योगदानही द्यावे.
मनातलं बोललात. अशी वेगळी चर्चाच मला सुरू करायची होती (चर्चा करायला काय जातंय?). काय प्रकल्प हाती घ्यायचा हे ठरायला वेळ लागेल, पण करून पाहायला काय हरकत आहे? माझा पंख वर आहे.
थोडे अवांतर - मनोगताबद्दल माझी मनातल्या मनात काही स्वप्नं आहेत. ती अशीः
१. मराठी व्यतिरिक्त इतर प्रमुख भारतीय भाषांसाठी मनोगतासारखे व्यासपीठ तयार व्हावे ("कालनिर्णय आपो ने"). तांत्रिक साचा तयार आहेच (ते ठीक आहे, पण मनोगतासारखी संस्कृती गुजराती आणि तामिळ मध्य कोठून आणणार?)
२. अमेरिकेत नॅशनल पब्लिक रेडियो नावाची लोकांनी आर्थिक वर्गणीतून चालविलेली एक अत्यंत आदरणीय संस्था/व्यासपीठ आहे. अ-व्यापारी धोरण, निःपक्षपातीपणा (बराचसा), उच्च आणि संपन्न अभिरुची आणि दर्जा, ही एन. पी. आर. ची वैशिट्ये. मनोगताकडे ती सगळी आजही आहेत. मनोगत संकेतस्थळापुरते मर्यादित न राहता, त्याची वाटचाल एन. पी. आर. सारखी होवो ही मनोमन प्रार्थना.
- कोंबडी