लोकशाहीत दरडोई एकच मत असते. बुध्दिमान, सुसंस्कृत, विचारी, कर भरणारा/री असला/ली तरी एक मत आणि अडाणी, बिनडोक, कंगाल असला तरी एक मत. ही व्यवस्था चुकीची आहे.
सुशिक्षित माणसाच्या मताला जास्त किंमत हवी, वयानुसार (काही मर्यादेपर्यंत) मताची किंमत वाढवायला हवी, कर भरणाऱ्याच्या मताला जास्त किंमत हवी. मॅट्रीक झालेल्यापेक्षा पदवीधराच्या मताला जास्त किंमत असावी तर वरच्या वर्गाला मतदान करावेसे वाटेल. आज अडाणी, उथळ लोकांची संख्या जास्त आहे. ते लोक कुठल्याही थिल्लर आणि सवंग प्रचाराला बळी पडतात आणि पुढारी भक्कम मते मिळवतात. देशी दारुची बाटली, अंथरुण पांघरुण असल्या लाचा देऊन झोपडपट्टीवाल्यांची मते मिळवणे कितीतरी सोपे. मुस्लिम मुल्लामौलवींच्या दाढ्या कुरवाळून, पाकिस्तानची थोरवी गाऊन मुस्लिम मतांचा गठ्ठा मिळतो. दलित वगैरे मंडळींना कोटा, शेतकऱ्यांना फुकट वीज इत्यादी मूर्खपणाची खैरात करुन लोकांनी निवडणुका जिंकल्याचे तर ताजेच उदाहरण आहे.
बुद्धीमंतांची मते मिळवणे अवघड आहेच आणि शिवाय त्यांच्या मतांची संख्याही कमी आहे त्यामुळे पुढारी त्यांना खूष करायच्या भानगडीत पडत नाहीत. जर अशा मतांची किंमत वाढवता आली तर कदाचित हे दुष्टचक्र बदलेल. (अर्थात त्यातही गैरप्रकार होतीलच!)