भारतात युरोपीय लोक मसाले, रेशीम इत्यादींच्या व्यापारासाठी आले, ज्ञानार्जनासाठी नाही असे वाटते.
याचे संस्प खालीलप्रमाणे-
वरील वाक्याचा मुख्य संदर्भ १४९८ नंतर आलेल्या युरोपीयांच्या झुंडींशी होता. पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश यांनी भारताला व्यापारी वसाहतीचे रूप देण्यासाठी गलबते भरभरून माणसे आणली. त्यात ज्ञानार्जनासाठी आलेले किती आणि व्यापारासाठी आणलेले किती राजकारणासाठी पाठवलेले किती हे पाहता ज्ञानार्जनासाठी आलेल्यांची संख्या केवळ मूठभर भरावी.
१४९८ च्या आधी युरोपीय अभ्यासक येऊन गेले, नाही असे नाही. पण त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकी आहे असे वाटते.
खैबर खिंडीतून जे कोणी पाश्चिमात्य/युरोपीय आले ते भूभागावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आले होते असे वाटते.
त्यामुळे गेल्या दोन हजार वर्षात युरोपातून भारतात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्यांची संख्या, इतर कारणांसाठी आलेल्यांपेक्षा नगण्य होती असे वाटते.
तसेच ज्यांना आपण "ज्ञानार्जनासाठी" आलेल्यामध्ये मोजतो आहोत त्यातून कोणाकोणाचे वकील, खाजगी इतिहासकार, किंवा उत्सुक प्रवासी या सर्वांना वजा करून कोणा भारतीयाला गुरू मानून पारंपरिक भारतीय ज्ञानसंपदा आत्मसात करणारे किती जण होते?