लेखकु चैतन्य यानी अगदी कळीचा मुद्दा उचलला आहे हे बारा मनोगतीनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसत आहे,आणि माझीही असा निधी (किंवा त्याला योग्य नाव ठरवता येईल पण असा आर्थिक पाठिंबा) निर्माण करण्यास हातभार लावायची पूर्ण तयारी आहे.मात्र असा हातभार लावताना तो पूर्ण पणे निरपेक्ष भावनेने लावायला हवा असे मला वाटते कारण अशा सार्वजनिक कार्या बाबतीत माझा स्वतःचा अनुभव असा आहे की आर्थिक पाठिंबा देणारे लगेच आपल्या अपेक्षांचा भार संयोजकां (अथवा येथे प्रशासकां)वर टाकू लागतात.