आपण इथे खूप षटकार मारले आहेत. ...
संपूर्ण चर्चा मी परत एकदा नजरेखालून घातली. आश्चर्य म्हणजे अपवाद म्हणूनही एकही प्रतिसाद logic सोडून, केवळ पूर्वग्रहदूषित तर्क/हेतू मनात धरून लिहिलेला आढळला नाही. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद! (प्रत्येकास स्वतंत्र धन्यवाद देत उगाच प्रतिसादांची लांबी वाढवणे टाळतो.)
चर्चाप्रवर्तक या नात्याने "आपण' हे संबोधन मला असल्यास चर्चाप्रस्तावातही समतोल दृष्टिकोन आणि प्रामाणिक शंका हीच भावना आहे.

एखादा मुद्दा आपल्या सोयीचा आहे वा खरा असावा असे वाटते म्हणून तो तसा असतो असे मात्र नाही.

विचक्षण - हे मोलाचे सूत्र पुन्हा एकदा अधोरेखित केल्याबद्दल आपले मनापासून स्वागत!

विचक्षणांसह अन्य कोणाशीही तावून सुलाखून घेण्यास नेहमीच तयार असलेल्या देशाभिमान्यांचा दूत - एकलव्य