मराठी वाचवण्यासाठी काहीतरी भव्यदिव्य किंवा विशेष आपण सर्वच करू शकू असं नाही पण म्हणून काहीच करायचं नाही असं नाही ना?
जे. पी. मॉर्गन यांनी जे केलं ती सुरुवात आहे अजून खूप पलला गाठायचा आहे. या गोष्टी लहान वाटतील पण फायदा नक्कीच होईल असं वाटतं. बघा ना 'मक्के दी रोटी', 'करवा चॉथ' कुठ पर्यंत पोहोचले आहेत. सिनेमा मधे कानीकपाळी हेच सांगितलं जातं ना?
मराठी सही साठी मला पुण्यातच एका बँके ने हटकलं होतं. खातं काढणार नाही अशी धमकी दिली तेव्हा ठिकाणावर आले.