मी-
१. ज्यांना मराठी येतं त्यांच्याशी मराठीत बोलतो.
२. मराठीतील शब्द, वाक्यरचना आणि त्याच्यावर होणात वर्तमानाचा परिणाम याचा अभ्यास करतो. नवीन शब्द तयार करायचा प्रयत्न करतो आणि नामशेष होत चाललेले शब्द, वाक्प्रचार, म्हणी आवर्जून वापरतो.
३. बंगलोर मधे रहाणाऱ्या मराठी लहान मुलांशी मराठीतच बोलतो.
४. चांगली मराठी पुस्तके, चित्रपट/संगीत सीडी विकत घेतो.
५. घरी मराठी वृत्तपत्र घेतो. (इथे ते दुसऱ्या दिवशी मिळते).
६. जिथे शक्य असेल तिथे मराठीतून लिहितो, उदा. दैनंदिनी, इतर टिपणे, सामानाच्या याद्या इ.
-भाऊ