साक्षीदार महाशय,
आधारित गज़ल छान आहे.
निमूट नांदावया घरी ती कुणीतरी घरगडी हवा ना?
म्हणून करतो धुणी व भांडी करून काळीज पत्थराचे
हिच्यासवे राहतो जरी मी तिला कधी सोडलेच नाही
हिच्यात मी रौद्ररूप बघतो तिच्यात माधुर्य ईश्वराचे
हे विशेष आवडले.
आम्ही हा शेर असाही वाचला -
हिच्यासवे राहतो जरी मी तिला कधी सोडलेच नाही
हिच्यात मी द्वैतरूप बघतो तिच्यात अद्वैत ईश्वराचे
आपला
(उभयवादी) प्रवासी