डॉ. साती,

आपली ही कहाणी फारच उत्तम वठली आहे.  तुमचे जितके कौतुक करावे ते थोडेच आहे.

यावरून चि.वि. जोशांच्या (कां श्री.कृ.कोल्हटकरांच्या? असा थोडा गोंधळ आहे) पाककृतीची आठवण झाली.  त्यात भुईमुगाच्या टरफलाचा चिवडा अशा पदार्थाची पाककृति दिली आहे.  त्यात प्रथम सूपभर टरफले घ्यावी.  नंतर फोडणी करून त्यात घालावि, त्यांत पोहे आणि इतर सामान घालून चिवडा करावा.  खायला देताना टरफले वेचून काढून मग द्यावा असे लिहिले होते.

आपले उत्तम साहित्य निर्मितीबद्दल पुनश्च अभिनंदन.

कलोअ,
सुभाष