• गणेशोत्सवात मोठ्या आवाजात "सुखकर्ता दुःखहर्ता" ही मराठी आरती म्हणतो.
  • ज्यांना मराठी समजते त्यांच्याशी मराठीतच बोलतो. परदेशातही मराठी माणूस भेटला तर त्याच्याशी मराठीतूनच बोलतो...तो कोणत्याही भाषेत बोलला तरी.
  • संक्रांतीला मुद्दाम सगळ्यांना तिळगूळ वाटून "आमच्यात असं का असतं" हे समजावून सांगतो.
  • पुरणपोळीसारखे मराठी पदार्थ अमराठी लोकांना आवर्जून खायला घालतो.
  • (महाराष्ट्रातल्या) कोणत्याही दुकानात किंवा इतरही कुठे सार्वजनिक ठिकाणी मी कटाक्षाने मराठीनेच सुरुवात करतो.
  • मी चांगल्या मराठीतच बोलायचा प्रयत्न करतो..(म्हणजे प्राज्ञ मराठी हो!)
  • तसेच हिंदी भाषिकांशी बोलताना काही विवक्षित शब्दांसाठी इंग्रजी प्रतिशब्दांचा आधार न घेता संस्कृतोत्भव मराठी शब्दांचा आधार घेतो.
  • जेंव्हा जेंव्हा शक्य आहे तेंव्हा लोकांना / नातेवाईकांना / मित्रांना मराठी पुस्तके भेट देतो.
  • मराठी गाण्यांच्या ध्वनिफिती विकत घेतो. मराठी नाटकांना आवर्जून जातो.
  • अमराठी प्रदेशात राहणाऱ्या मराठी लहान मुलांशी मराठीतच बोलतो.
  • चांगली मराठी पुस्तके विकत घेतो.
  • जिथे शक्य असेल तिथे मराठीतून लिहितो, उदा. सामानाच्या याद्या इ.
  • मराठी बोलताना आणि लिहिताना शुद्धलेखनाचा आग्रह धरतो.