गोळेकाका,

टगोजीराव, आपल्या नावातच अनेक गावचे पाणी प्यायल्याची छटा आहे. तशीच बिनधास्त आपली अभिव्यक्ती आहे. आपल्या बव्हंशी विचारांशी मी पूर्णतः सहमत आहे.

अनेक गावचे... हो, खरे आहे. गावांची मोजदाद करणे फार पूर्वी सोडले.

मात्र, सर्वसाधारण दहशतवादाचा प्रतिबंध, प्रतिकार आणि निःपात करण्याचा मार्ग निस्संशयपणे प्रेमाचा, सुसंवादाचा आणि सामंजस्याचा आहे.

मूलतत्त्ववाद्यांजवळ बहुधा अज्ञान, दारिद्र्य आणि गैरसमजुतींचा सुकाळ असतो. याव्यतिरिक्त जेव्हा त्यांचा इतर जगाशी संपर्कही तुटतो तेव्हा दहशतवाद निर्माण होतो. आपण सुसंवाद साधू शकलो तर ते जग तुटक न पडता त्यांना स्वतःतील तुटींची जाणीव आधी होईल. दुसऱ्यांच्या दुस्वासाची धग नंतर उमजेल.

हे सर्व भविष्यात होऊ घातलेल्या संभाव्य दहशतवाद्यांना माणसांत आणण्यासाठी, त्यांचे दहशतवादी बनणे टाळण्यासाठी ठीक आहे - नव्हे, मी म्हणेन आवश्यकच आहे - पण आज आपल्याला मारायला उठलेल्या, निर्ढावलेल्या दहशतवाद्यांचे काय करायचे?

एक कथा आठवते - थोडी offbeat आहे, आणि punchline इंग्रजीत सांगणे भाग आहे, पण त्यातून मला नेमके काय म्हणायचे आहे ते कदाचित लक्षात यावे.

एकदा एका गावात एक लांडगा शिरतो आणि गावकऱ्यांच्या मेंढ्यांवर हल्ले करून त्यांना मारून खाऊ लागतो. साहजिकच याचे काय करायचे, हे ठरवायला गावकऱ्यांची सभा भरते. लांडग्याला नेमके कसे मारावे यावर चर्चा सुरू होते.

लांडग्याला मारायची गोष्ट निघाल्यावर गावातल्या प्रतिष्ठितांपैकी एक प्राणिदयावादी विदुषी असते, ती अपेक्षेप्रमाणे उभी राहून विरोधात भाषण देऊ लागते. तिच्या मते लांडग्याला मारणे हे क्रौर्य आहे, त्यापेक्षा लांडग्याला पकडून sterilize करावे, म्हणजे लांडग्यांच्या लोकसंख्यावाढीला आळा बसून काही कालावधीनंतर आपोआप प्रश्न सुटेल, आणि लांडग्याचीही हत्या होणार नाही.

यावर एक गावकरी उठून उभा राहतो आणि तिला उद्देशून म्हणतो, "बाईसाहेब, तुम्ही मोठ्या आहात, शिकल्यासवरल्या आहात, आणि मी पडलो अडाणी मेंढपाळ! तेव्हा तुमच्या विरोधात मी काही म्हणू शकत नाही. पण माझी एक अडचण आहे: The wolf is killin' my sheep, not makin' love to 'em!"

अधिक भाष्याची मला वाटते गरज नसावी.

- टग्या.