माझे सुद्धा नेमके हेच म्हणणे आहे की, शुद्धलेखनाचा आणि शुद्ध उच्चाराचा आग्रह योग्य आहे पण उच्चाराविषयी आपण आग्रह करू नये. कारण प्रत्येक भाषेप्रमाणे उच्चार हा बदलू शकतो.

उदा. जसे, 'पॅरिस' चा उच्चार 'पारी' असा करून चालणार नाही तसेच, 'Rhine' चा उच्चार 'ऱ्हाँ' (हिंदी मध्ये 'हाँ' म्हणतात तसा उच्चारावा) असं म्हणून चालणार नाही. किंवा 'एच' हा कायम 'सायलेंट' असल्याने, 'हॉटेल' ला 'ओतेल' म्हणणे अयोग्य होईल.