......ते उच्चार बरोबर किंवा योग्य आहेत असे म्हणण्याऐवजी ते RP म्हणजे रिसीव्हड प्रोनन्सिएशन म्हणजेच असे उच्चार जे जास्तीत जास्त लोकांना समजतील या वर्गात मोडतात असे म्हणणे उचित.

२. ते असेही सांगतात की इतर देशातल्या लोकांनी त्या पुस्तकात दिलेल्या उच्चारांचे अनुकरण करण्याऐवजी आपापल्या देशातील RP प्रमाणे उच्चार करणे हे अधिक योग्य आहे. (इतके लिहिले असूनही लोक त्यांनी दिलेल्या उच्चारांना आदर्श मानायचे सोडत नाहीत.) एका अधिकारी व्यक्तीने दिलेल्या वरील शहाणपणाच्या सल्ल्याचा विचार करता व परकीय भाषांतील शब्दांच्या बाबतीत नसलेली एकवाक्यता लक्षात घेता अचूक उच्चारानुवर्ती लेखनाचा आग्रह न धरलेला बरा असे मला वाटते.

मला हे पटते.