पण जे झाले ते चांगले नाही झाले. आहो ती पोटुशी हाये!" 

मला एकदम धक्काच बसला. खूप वाईट वाटले. पण देवा शप्पथ सांगतो चूक माझी नव्हती.

आँ.....?
अच्छा, अच्छा,  म्हणजे तिला धक्का लागला ही तुझी चूक नव्हती. जरा स्पष्ट लिही की लेका, माझ्यासारख्या तिरकस माणसाचा काय समज होईल?

सचिन फारा दिवसांनी तुझे स्वतंत्र लिखाण वाचले. ('सचिनचा एकेके प्रतिसाद म्हणजे एकेके लेखच असतो' असे काही कुजकट लोक म्हणतात, पण आपण तिकडे लक्ष देऊ नये!) आवडले. 'मनोगत' वर लेखनातिसार झालेल्या (आमच्यासारख्या) मंडळींनी आता जरा बाजूला सरकून तरूण रक्ताला वाव द्यावा हे बरे!