जाणून घ्यायला आवडेल. चांगला उपक्रम. उपयुक्त माहिती.

कानामागून आली आणि तिखट झाली--- मूळ म्हण आहे पानामागून आली आणि तिखट झाली. मिरच्यांच्या रोपांना अगोदर पानं लागतात आणि नंतर मिरच्या लागतात. त्या वरून ही म्हण आली असावी.
साशंक. सर्वच रोपांना आधी पाने लागतात आणि नंतर फळे. मग मिरचीचे वैशिष्ट्य काय?

' नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा' - कथील हे कल्हई करताना वापरतात. कल्हई करणे हा हलका धंदा मानला जातो. याच अर्थाची गावाकडे 'नाडापुडीचं दुकान आणि ऐट सरदाराची' अशी म्हण आहे. नाडापुडी म्हणजे पीरासमोर मोहरममध्ये लावायच्या उदबत्त्या. त्याची विक्री अशी किती असणार? आणि ऐट मात्र.. 
बाकी आठवेल तसे.