१.ज्यांना मराठी येतं त्यांच्याशी मराठीत बोलतो. (ज्यांना येत नाही घरात, त्यांच्याशीही बोलते)
२.पूर्वी आवर्जून पुस्तकं घ्यायचे आता शक्य झाल्यास घेते.
३.लोकसत्ता आणि म.टा. वाचते आणि बरेच वेळा कपाळावर हात मारून घेते (आजच्या लोकसत्तेतील बातमी "चमकेश" अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री नाराज)
४.मराठीतून अनुदिनी लिहिते.
५.आमच्या आंग्लाळलेल्या मराठी मंडळाला जिथे मिळेल तिथे हाणते. (हल्ली सगळे निमूटपणे बरहा वापरतात, मराठीतून लिहितात. तेव्हा हाणणे सफल)
६.कुणा पाश्चात्याने खोलात जाऊन भाषांविषयी विचारल तर हिंदी आमची राष्ट्रभाषा असून मराठी ही मातृभाषा आहे असे सांगते.(उपयोग तसा फारसा नाही, तरीही अबूधाबीला असतान पूर्वी पुण्यात शिकलेला एक आफ्रिकन मनुष्य मोडक्या तोडक्या मराठीत बोलायचा तेव्हा धन्य वाटायच.. आणि बाकीची जनता तोंडात बोट घालायची :))
७.लोकांना सांगते की मी मराठी आहे. (महाराष्ट्रियन नाही)