वा मृण्मयीजी!
पथिक अजून थांबला कुठे
थकून वाट का विसावते
शिखर असो सुरम्य साजिरे
वसावया दरीच लागते
हे शेर आवडले... दोन्ही कल्पना नवीन आहेत.
मक्ता / तखल्लुस फारच सुंदर आहे.
- कुमार
ता. क.
जळात मी असून कोरडी
सरस्वती उगीच वाहते
या शेराचा अर्थ कळला नाही. कृपया सांगाल का?