माझ्या माहितीप्रमाणे "रिकामा न्हावी......" या म्हणीची व्युत्पत्ती वेगळी आहे.

पूर्वी न्हावी लोक वैद्यकीपण करायचे.  त्यावेळी वस्तऱ्याने छेद देऊन रोग्याचे (अशुद्ध) रक्त निचरून काढणे असा एक उपाय असे तो विशेषतः न्हाव्यांकडून करविला जायचा.  तुंबडी ही एक बारीक नळी त्यासाठी वापरली जात असे.  जर न्हाव्याला काही काम नसेल (हजामतीचे किंवा रक्तशोषणाचे) तर तो वेळ घालविण्याकरता ती तुंबडी उगाच भिंतीला लावे, त्यावरून ही म्हण आली.

(रिकामटेकडा)
सुभाष